अश्रुंना वाट देत ओठ मुकेच राहिले,
पाणावलेल्या नयनांना अलगद सरकू दिले.
हृदयाच्या ठोक्यांना मनाच्या भावविश्वाने हरवले,
गुंतागुंत वाढत जाऊन नवीन कोष बनले.
न बोललेले संभाषण अपूर्ण राहिले,
समजून न घेता उगाच तुझ्यावर रागावले.
नजरेसमोर तू नसताना तुला शोधत राहिले,
तुझ्या विचाराने मनही स्वता:ला विसरले.
पाखरांना निरोप दिला तेही तसेच परतले,
लवकर भेटशील या आशेने मी स्वता:ला सावरले.
You went away in search of a bright future,
but left me with your memories.
I know we shall meet soon,
but the seperation seems very long.
My eyes long to see you, come back soon.
No comments:
Post a Comment