30 October 2015

Bhaubeej


16 November 2011

क्षणाचा अबोला

ह्रदयाला छेडून काहीतरी जाते
जशी आकाशात वीज कडाडते,
मनात काही नसतानाही
वादविवादाची ठिणगी का पडते?कारण शुल्लक असूनही
कारण मोठे का वाटते,
आपणच बरोबर आहोत
जाणीव पाठलाग का करते?


तडजोडीच्या नावाखाली
अबोलेपण सोपे वाटते,
दिवसाखेर चूक झाल्याची
भावना जागृत होते.


प्रेमाच्या अखंड वर्षावानंतर
अविश्वासाने जागा का घेते?
साथीदाराची साथ असतानाही
कुठेतरी नेमके काय चुकते?


अबोले क्षण हरवून जातात
पुन्हा प्रेमाची पाहत होते,
साथीदाराच्या सहवासात
श्वासात जीवन भरून जाते.


Sometimes, we get upset over petty things.
People whom we love most....why do we not see their point?
Can I not express my view openly,
Why does everyone feel that they are always right?


Such complex is life that sometimes I laugh at it afterwards,
Was there a need for the impulsiveness?
How stupid had I been at times?
The best thing is that love wins over again and again, only to become stronger each time.
and life carries on...

19 June 2011

अनुत्तर

 जग तत्वज्ञानांनी भरूनही
माझा घडा रिक्त का आहे?
सर्व सुख - सुविधा असूनही
मला कशाची हाव आहे?


द्रुष्ट लागणारे जीवन असूनही
अश्रूंना वाट का आहे?
मनाला आवर घालणं
कुठवर मला शक्य आहे?


कस्तुरी जवळ असूनही
मी नि:शब्द का आहे?
जीवनाच्या अर्ध्याटप्प्यावर पोचूनही
हिशोबी शून्य का आहे?


उत्तरे माहित असूनही
प्रश्नांची सरबत्ती चालू आहे,
द्रुष्टीकोन बदलणे अशक्यच
ही भावना का आहे?


क्षितीज गाठण्याची इच्छा असूनही
मार्ग अंधकारात का आहे?
देवा लवकर सुबुधी दे
तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

27 February 2011

चातक

तुझ्या परतीकडे डोळे
वाट लाऊन बसतात,
अनेक आभासी प्रतिमा
डोळ्यांना छेदून जातात.


अश्रुंचे दवबिंदू
बांध फोडून देतात,
घरट्यात विसावण्यासाठी
तेही थबकतात.


सुखद टपोरे क्षण
क्षणोक्षणी डोकावतात,
स्मृतींचे मोरपिसे
मनाला स्पर्शून जातात.


तुझ्याच चरणाशी
सर्वस्वी सुमने पडतात,
तूच माझे जीवन
तेच नाते ठरवतात.


तुझ्या मिलनासाठी
हे श्वासही अडकतात,
अश्रूच सामोरे येऊन
वेड्या मनालाही समजावतात.


तुझ्या पावलांची चाहूल
कानही वेध घेतात,
मागे वळून पहिले असता
पाऊलेही अदृश्य होतात.


वेडे मन वेडे पाखरू
पदोपदी तुझ्यासाठी भिरभिरतात,
क्षणभर विसावा घेऊन
चातक प्रवासाला निघतात.

:sparkle:
"Though the chatak bird is about to die of a parched throat,
and around it there are seven oceans, rivers, and lakes
overflowing with water, still it will not touch that water.

Its throat is cracking with thirst,
and still it will not drink that water.
It looks up, mouth agape, for the rain to fall
when the star Svati is in the ascendant.

To the chatak bird all waters are mere dryness beside Svati water.'