19 June 2011

अनुत्तर

 जग तत्वज्ञानांनी भरूनही
माझा घडा रिक्त का आहे?
सर्व सुख - सुविधा असूनही
मला कशाची हाव आहे?


द्रुष्ट लागणारे जीवन असूनही
अश्रूंना वाट का आहे?
मनाला आवर घालणं
कुठवर मला शक्य आहे?


कस्तुरी जवळ असूनही
मी नि:शब्द का आहे?
जीवनाच्या अर्ध्याटप्प्यावर पोचूनही
हिशोबी शून्य का आहे?






उत्तरे माहित असूनही
प्रश्नांची सरबत्ती चालू आहे,
द्रुष्टीकोन बदलणे अशक्यच
ही भावना का आहे?


क्षितीज गाठण्याची इच्छा असूनही
मार्ग अंधकारात का आहे?
देवा लवकर सुबुधी दे
तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

No comments: