ह्रदयाला छेडून काहीतरी जाते
जशी आकाशात वीज कडाडते,
मनात काही नसतानाही
वादविवादाची ठिणगी का पडते?
कारण शुल्लक असूनही
कारण मोठे का वाटते,
आपणच बरोबर आहोत
जाणीव पाठलाग का करते?
तडजोडीच्या नावाखाली
अबोलेपण सोपे वाटते,
दिवसाखेर चूक झाल्याची
भावना जागृत होते.
प्रेमाच्या अखंड वर्षावानंतर
अविश्वासाने जागा का घेते?
साथीदाराची साथ असतानाही
कुठेतरी नेमके काय चुकते?
अबोले क्षण हरवून जातात
पुन्हा प्रेमाची पाहत होते,
साथीदाराच्या सहवासात
श्वासात जीवन भरून जाते.
Sometimes, we get upset over petty things.
People whom we love most....why do we not see their point?
Can I not express my view openly,
Why does everyone feel that they are always right?
Such complex is life that sometimes I laugh at it afterwards,
Was there a need for the impulsiveness?
How stupid had I been at times?
The best thing is that love wins over again and again, only to become stronger each time.
and life carries on...
जग तत्वज्ञानांनी भरूनही
माझा घडा रिक्त का आहे?
सर्व सुख - सुविधा असूनही
मला कशाची हाव आहे?
द्रुष्ट लागणारे जीवन असूनही
अश्रूंना वाट का आहे?
मनाला आवर घालणं
कुठवर मला शक्य आहे?
कस्तुरी जवळ असूनही
मी नि:शब्द का आहे?
जीवनाच्या अर्ध्याटप्प्यावर पोचूनही
हिशोबी शून्य का आहे?
उत्तरे माहित असूनही
प्रश्नांची सरबत्ती चालू आहे,
द्रुष्टीकोन बदलणे अशक्यच
ही भावना का आहे?
क्षितीज गाठण्याची इच्छा असूनही
मार्ग अंधकारात का आहे?
देवा लवकर सुबुधी दे
तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
तुझ्या परतीकडे डोळे
वाट लाऊन बसतात,
अनेक आभासी प्रतिमा
डोळ्यांना छेदून जातात.
अश्रुंचे दवबिंदू
बांध फोडून देतात,
घरट्यात विसावण्यासाठी
तेही थबकतात.
सुखद टपोरे क्षण
क्षणोक्षणी डोकावतात,
स्मृतींचे मोरपिसे
मनाला स्पर्शून जातात.
तुझ्याच चरणाशी
सर्वस्वी सुमने पडतात,
तूच माझे जीवन
तेच नाते ठरवतात.
तुझ्या मिलनासाठी
हे श्वासही अडकतात,
अश्रूच सामोरे येऊन
वेड्या मनालाही समजावतात.
तुझ्या पावलांची चाहूल
कानही वेध घेतात,
मागे वळून पहिले असता
पाऊलेही अदृश्य होतात.
वेडे मन वेडे पाखरू
पदोपदी तुझ्यासाठी भिरभिरतात,
क्षणभर विसावा घेऊन
चातक प्रवासाला निघतात.
"Though the chatak bird is about to die of a parched throat,
and around it there are seven oceans, rivers, and lakes
overflowing with water, still it will not touch that water.
Its throat is cracking with thirst,
and still it will not drink that water.
It looks up, mouth agape, for the rain to fall
when the star Svati is in the ascendant.
To the chatak bird all waters are mere dryness beside Svati water.'
विवाहापूर्वी जोडीदाराचे
स्वप्नचित्र वेगळेच असते,
कल्पवृक्षाची, प्रेमाची
ती सावली वाटते.
काही कालावधीसाठी
चित्र खरे वाटते,
स्वप्नांच्या जगात
हरवून जावेसे वाटते.
दिवस पुढे सरकतात
आयुष्याची दिशा बदलते,
एकमेकांच्या कमजोरीला
लक्ष्य बनवले जाते.
वाद वाढतात, विकोपाला जातात
मन समजूत काढते,
पोकळी वाढत जावून
दरी तयार होते.
अतूट प्रेम असूनही
पटवणे अवघड होते,
तुझ्याविना जगणे अशक्य
सांगणे कठीण जाते.
निस्वार्थ प्रेमाची जागा
कर्तव्याने घेतली जाते,
आसवेही निष्फळ ठरतात
रुदय धडधडू लागते.
आधार कमकुवत झाल्याची
कुठेतरी जाणीव होते,
प्रेम आटत गेल्याने
पोरकेपणाची चाहूल लागते.
मनाची घुसमट वाढत
सहनशक्ती येत राहते,
हेच जीवन आहे समजून
मनही घायाळ होते.
आजी-नात्याच्या प्रेमाला
उपमा देणे अशक्य ठरते,
दोन एकत्रित जीव
वेगळे करणे शक्य नसते.
जीवनाच्या वळणावर निमित्तमात्र
एकत्रित यायचे कारण ठरते,
जन्मोजन्मीचा ऋणानुबंध
दोघींचं भावविश्वच बदलते.
जन्मदात्यापेक्षाही अतूट माया
आजीची अनमोल ठरते,
उत्तरार्धात बोबड्या बोलाने
जीवन अधिकच सुंदर वाटते.
थोडा रागोबा, थोडा रुसवा
बाळाचा ती सहन करते,
आदर्श संस्कार शिकवताना
बोट पकडून चालायला शिकवते.
बाळाच्या मागे दुडू दुडू धावताना
आजी सगळ्या वेदना विसरते,
मोरपिसाच्या देखाव्यात
ती भूतकाळात हरवून जाते.
क्षणापुरता तो सहवास, गोड आठवण
भावनिक बंधनात गुंतवून ठेवते,
बाळाची 'आज्जी' साद ऐकण्यासाठी
आजी श्वास रोखून ठेवते.
I couldnot find any example to express the love that a grand-mother gives to her little grand-daughter.
After a while, it becomes impossible to seperate the two souls that have formed a deep bond.
Life sometimes brings them together for some moments, but it creates a unique the chemistry between them.
Their own worlds change & they discover a new meaning for their lives.
The grandma 'pampers' the little one like there is no end to the world, forgets her own pains to carry the little one on her shoulders all day long.
She gives so much 'love' that the child feels like the most special person in the world.
Where does grandma find so much energy, the new games, the new stories and all the treasures for this little one?
Now that she has got a new life, can they be seperated?
The 'special moments' spent with the grandma are one of the most precious gifts in life- the baby will keep these memories always in the heart. She will now look for the grandma in her mother's eyes.
The bond is made now- they are inseperable for life.
मन कधी गगनाला भिडतं
सागरही तरुण जातं,
धरणीला छेडत जातं
अनं पावली परत येतं.
कधी स्वप्नात, कधी अस्तीत्वात
सुसाट गरुडझेप घेतं,
आसमंतात विहारतं
अनं पावली परत येतं.
कधी भूत, कधी वर्तमान
भविष्यकाळातही डोकावतं,
आठवणींचा ससेमिरा चुकवतं
अनं पावली परत येतं.
गोड क्षणात नकळत विसावतं
कटू स्मृतीने गहिवरतं
मर्म संस्कार जीवनावर करतं
अनं पावली परत येतं.
सुखदु:खाच्या वृक्षाखाली
लपंडाव खेळत,
एखादया क्षणी फुगूनही बसतं
अनं पावली परत येतं.
सावलीसारख सोबतच असतं
रागावल तरी हसतच असतं
आपली समजूत काढतं
अनं पावली परत येतं.
छोटया स्फटिकाइतका जीव
पण विश्वच अपूर पडतं,
साथ न सोडता
दिशा दाखवत राहतं.
My mind is so wild sometimes,
it takes flights of fancy before realising the truth.
It sometimes believes that the 'shadow' is more interesting & could be the real object.
What a speed crazy thing is mind,
it moves instantly from past to present & to future- all together.
And the miles mean nothing to it- as it travels from a place to another in no time.
Which one is the reality- my dreams or the routine when I wake up?
I love my mind, its always with me & keeps me entertained.
स्वप्ने दुभंगली जातात
जीवनपथावर सत्याचे ओरखडे पडतात,
उमेदीने त्यांना जोडायचं असतं
आयुष्य असंही जगायचं असतं.
कालांतराने पापण्या रिक्त होतात
राहते फक्त आठवणींची गुंफण,
कधीतरी दवबिंदू टपकतात.
कुंपणातून बाहेर पडायचं असतं
आयुष्य असंही जगायचं असतं.
प्रवाहात एक प्रवासी मिळतो
अमृतरसतुल्य सर्वस्व ठरतो,
तनमन चरणी अर्पायचं असतं
आयुष्य असंही जगायचं असतं.
मार्ग काढत दिशा सापडते
खळगे लागतात, पायाला बोचतात,
पदक्रमण करताना पुढे पाहायचं असतं
क्षितीज गाठताना वेदनांना विसरायचं असतं.
आयुष्य असंही जगायचं असतं.
There is always 'LIGHT' at the end of the tunnel.
You will meet many nice people to share happy memories,
these are the ones who bring sunshine into your days.
Who hasnt seen the 'downs' in life, but time spent dwelling on these,
is a time wasted for no reason.
Isnt life too short to gather all the goodness around?
Can you see the joys in children's smiles, the dew-drops on leaves?
Good days come & good days go.....only the memories remain.
Time doesnt stop for anyone, but the memories can be captured permanently.
Choose your destination, choose your path.
Look no-where else & create your destiny.
Life CAN be lived in this way too.
Why has my world changed since you came into my life....
तुझ्याविना राहायचं कसं
मनालाही कळत नाही,
जाण्याच्या संकल्पाचे
परिणामही कळत नाही.
आत्म्याविना राहायच कसं
देहालाही कळत नाही,
श्वासाविना जगायचं कसं
रुदायालाही कळत नाही.
आठवणींचा मोरपिसारा
खुलण्याचा थांबत नाही,
सुखाचे दवबिंदू टिपताना
देहही थकत नाही.
वाटेकडे डोळे लावून बसणं
मनही विसरत नाही,
तू इतक्यात येणार नाहीस
जीवाला पटतच नाही.
तुझ्याबरोबरचे स्वर्गसुख सहवासाची
परिभाषा विसरत नाही,
वाट पाहणे वेदनादायक
शरीरही थकत नाही.
प्रेमाचा आंधळेपणा
डोळस दृष्टीनाही दिसत नाही,
प्रेमाची मजा अनुभवण्याची
वयही विसरत नाही.
Why is is that you are everywhere.....in all my thoughts.
I sometimes laugh on myself that I couldnt be blind in love.
Not a single breath goes without you in my mind.
I have forgotten all my ambitions, goals, all I want is you.
Every moment we share together are eternal, all the laughters together, the tears while leaving....
Some of those silent moments when we just looked eath other in eyes & the time stopped...the breeze, the birds and the sweet smell of flowers you buy for me.
Why has my world changed since you came into my life....